कोरोनाबाधित मातेच्या नवजात बाळाचा मैत्रीणीकडून सांभाळ

Aishwarya Welhal taking care of Friend new born baby
Aishwarya Welhal taking care of Friend new born baby

सांगली : कोरोना Corona सारख्या जागतिक महामारीत माणुसकी लोप पावत आहे की काय अशी भीती व्यक्त होत असताना  सांगलीच्या Sangli कडेगाव येथील एक विवाहिता ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ या आपल्या शेजारच्या  कोरोनाबाधित मैत्रीणीच्या नवजात बाळाचा अकराव्या दिवसापासून सांभाळ करीत आहेत. नवजात बाळाला त्यांनी मातेचे प्रेम दिले आहे. कोरोना काळात ऐश्वर्या यांच्या माणुसकी धर्माला तमाम कडेगावकरांनी सलाम ठोकला आहे.

कडेगाव शहरांतील आझाद चौकात ऐश्वर्या वेल्हाळ आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका कुटुंबातील पाचपैंकी बाळाच्या मातेसह तिघांना कोरोनाची लागण झाली. संबंधित बाळाची माता ही कोरोनाबाधित असतानाच त्यांना कऱ्हाड Karad येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न झाले. आई कोरोनाबाधित तर निरोगी बाळाची तब्बेत काहीशी नाजूक असल्याने संबंधित नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस काचेमध्ये ठेवले. त्यानंतर संबंधित मातेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. Friend taking care of Newly born Baby of Corona Positive mother

त्यामुळे बाळाच्या मातेने आपल्या शेजारी राहत असलेली मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना आपल्या बाळाचा सांभाळ करण्याबाबत विनंती केली. त्यावेळी ऐश्वर्या यांनी कसलाही विचार न करता अकरा दिवसाच्या बाळाचा New Born Baby सांभाळ करण्याचे मान्य केले.  त्यांना पती अनिकेत व सासरे बाळासाहेब वेल्हाळ यांचेसह संपुर्ण कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. अशा रीतीने ऐश्वर्या या संबंधित बाळाचा अकराव्या दिवसापासून ते आज वीस दिवस झाले सांभाळ करीत आहेत.  त्या बाळाला दररोज न्हाऊ-खाऊ घालत असून त्याला मातेचे प्रेम दिले आहे.

तसेच त्या बाळाला किरकोळ आरोग्याची तक्रार निर्माण झाली तरी त्याला दवाखान्यात नेणे औषधोपचार करणे सर्व काही त्या करीत आहेत. त्यांच्या मायेच्या व प्रेमाच्या सावलीत संबंधित बाळ आता चांगलेच बाळसेदार झाले आहे. संकटसमयी त्यांनी घालून दिलेला हा आदर्श सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे. Friend taking care of Newly born Baby of Corona Positive mother

कोरोना काळात सर्वांनी माणुसकी जपली पाहिजे.  ज्या घरातील लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत केली पाहिजे. त्याप्रमाणे मी माझ्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाची अकराव्या दिवसापासून माझी स्वतःची मुलगी समजून सांभाळ करीत आहे, असे ऐश्वर्या यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com