कोरोनाचं आणखी एक भयानक रुप समोर...

साम टीव्ही
रविवार, 14 जून 2020
 • कोरोनाचं आणखी एक भयानक रुप समोर
 • 10 पट खतरनाक कोरोना व्हायरस प्रकाराचा शोध
 • अमेरिका, इटलीत सापडला कोरोनाचा आणखी एक प्रकार

कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असताना त्याचं आणखी एक भयानक रुप समोर आलंय. कोरोनाचं हे रुप 10 पट अधिक खतरनाक आहे.

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असताना, कोरोनाचा आणखी एक घातक प्रकार समोर आलाय. कोरोनाचा हा प्रकार आताच्या कोरोना व्हायरसपेक्षा 10 पटींनी अधिक खरतरनाक आहे. अमेरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटच्या अभ्यासातनं ही बाब समोर आलीय.

काय आहे नवा घातक कोरोना? 

 • अमेरिका, ब्रिटन आणि इटलीत कोरोनाचा हा नवा घातक प्रकार समोर आलाय.
 • कोरोनाचा हा प्रकार वुहान कोरोना व्हायरसपेक्षा 10 पटीनं अधिक भयानक आहे.
 • व्हायरसचा हा प्रकार शरिरातल्या रिसेप्टर्सवर थेट हल्ला चढवतो.
 • कोरोनाच्या या प्रकाराला D614G असं नाव दिलं गेलंय.
 • कोरोनाच्या या प्रकारात अन्य प्रकारांच्या तुलनेत 4 ते 5 टक्के अधिक स्पाईक प्रोटीन असतं
 • सध्या अमेरिकेसह युरोपमध्येच कोरोनाचा हा प्रकार आढळून येतोय. याठिकाणी कोरोनानं जास्त बळी घेतलेत. भारतात हा प्रकार आढळून आलेला नाही. असं जरी असलं तरी प्रचंड सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
   


संबंधित बातम्या

Saam TV Live