इंधन दरवाढ : 2012 नंतर असे वाढत गेले इंधन दर; वाचा सविस्तर 

petorl diesel price.jpg
petorl diesel price.jpg

देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा Fuel price hike भडका उडाला आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या Petrol-diesel दराने शंभरी गाठली आहे.  सरकारी तेल कंपन्यांनी Government oil companies आज पुन्हा एकदा पेट्रोल च्या दरात 28 ते 29 पैशांची आणि डिझेलच्या दरात 24 ते 28 पैशांची वाढ केली  आहे. मे 2021 या महिन्यातील सोळावी इंधन दरवाढ आहे.  मात्र गेल्या 8 ते 10 वर्षापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर किती होते, इंधनाचे दर कसे निश्चित केले जातात, आंतरराष्ट्रीय बाजारात आधी क्रूड ऑईलची Crude oil किंमत प्रति बॅरल किती होती आणि आता किती आहे,  असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याचाच एक आढावा..  (Fuel price hike: Fuel prices rising since 2012; Read detailed) 

  • असे निश्चित केले जातात इंधनाचे दर ? 

देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल होतात. दररोज सकाळी सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण देशात नवीन दर लागू केले जातात. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून पेट्रोल डिझेलच्या किमती दुप्पट होतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावरून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत राहतात. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम  इतर अत्यावश्यक गोष्टींवर होत असतो. खरतर  पेट्रोल किंवा डिझेलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाद्वारे निश्चित केली जाते. म्हणजेच जेव्हा कच्च्या तेलाची किंमत कमी होते किंवा वाढते, तेव्हा पेट्रोल किंवा डिझेलची किंमत स्वस्त किंवा महाग होत असतात. परंतु प्रत्यक्षात असे घडत नाही.  गेल्या एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच जानेवारी 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत आपण कच्च्या तेलाच्या किंमतींकडे पाहिले तर त्यातील वास्तवता समोर येते. या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांनी घट झाली, परंतु देशांतर्गत बाजारात सामान्य लोकांना 13 टक्के अधिक किंमत मोजावी लागत आहे. 

  • आंतरराष्ट्रीय बाजारात 2009 ते 2014  पर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल

आज कच्च्या तेलाच्या ब्रेंट क्रूडचे दर बॅरल सुमारे  63.57  डॉलर असून दिल्लीत पेट्रोलची किंमतही प्रतिलिटर 89 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर यूपीएच्या दुसर्‍या कार्यकाळात 2009  ते मे 2014  पर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल 70 ते 110  डॉलर इतकी होती. परंतु तरीही पेट्रोलचे दर 55 ते 80 रुपयांच्या दरम्यान होते.  देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतींशी संबंध आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमती खाली आल्या तर किरकोळ किंमतीही कमी  व्हायला पाहिजेत. परंतु बर्‍याच वेळा असे होत नाही. याउलट आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांनी घट झाली तरी भारतात  पेट्रोल जास्त किंमतीला विकले जात आहे.  

  • 2014 नंतर बदलत गेली क्रूडच्या प्रति बॅरलच्या किमती  

जानेवारी 2012  मध्ये मनमोहनसिंग सरकारच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 125 डॉलर्सपर्यंत पोहोचले. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत ते निरंतर 100  डॉलर प्रति बॅरलवर राहिले.  पण एप्रिल 2014  मध्ये  झालेल्या सार्वत्रिक  निवडणुकांनंतर क्रूडच्या किंमतीतील घसरणीलाही सुरुवात झाली. निवडणुकीच्या निकालाची माहिती मिळताच मे 2014  मध्ये सुरू झालेली ही घसरण डिसेंबर 2015 पर्यंत क्रूडची किंमत 100  डॉलर प्रति बॅरल वरून 50  डॉलर प्रति बॅरलवर आली.  तर जानेवारी 2016 पर्यंत, कच्च्या तेलाचे दर त्यांच्या प्रति-बॅरल 30 डॉलरपर्यंत घसरले.  कच्च्या तेलाची किंमत हा केंद्र सरकारच्या तिजोरीतला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा खर्च आहे. सरकारची आर्थिक आणि सामाजिक धोरणे अवलंबण्यासाठी येथे उरलेला प्रत्येक पैसा वापरला जातो. 

 गेल्या 10 वर्षातील पेट्रोल डिझेल च्या किमती प्रती लिटर 
                        पेट्रोल            डिझेल            इंधन दरातील तफावत  

Apr-12             Rs 65.6        Rs 40.91       Rs 24.69
Apr-13             Rs 66.09      Rs 48.63       Rs 17.46
Apr-14             Rs 72.26      Rs 55.48       Rs 16.78
Apr-15             Rs 60.49      Rs 49.71       Rs 10.78
Apr-16             Rs 59.68      Rs 48.33       Rs 11.35
Jul-16              Rs 62.51      Rs 54.28       Rs 8.23
July-17            Rs 63.09      Rs 53.33       Rs 9.76
July-18            Rs 75.55      Rs 67.38       Rs 8.17
July-19            Rs 72.96      Rs 66.69       Rs 6.27
June-20          Rs 79.76      Rs 79.88       Diesel Fuel for First Time                                                                            Exceed price of Petrol
March-21        Rs 91.17      Rs 81.47       Rs 9.7 / Litre

दरम्यान, 2014  मध्ये क्रूडच्या घसरणीचा फायदा 2015 मध्ये सर्वसामान्यांना मिळू लागला. क्रूड प्रति बॅरलचा दर  30 डॉलरच्या पातळीवर पोहोचला.  त्यांनंतर  दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 60 रुपयांवर घसरण झाली. तथापि, पेट्रोलची किंमत वर्षभरात 66 ते 60 रुपये प्रति लीटरपर्यंत होती. मात्र ऑक्टोबर 2016 पर्यंत स्वस्त पेट्रोलचा खेळ संपला आणि येथून पुन्हा पेट्रोलच्या किंमती वाढू लागल्या. यावेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 66 रुपयांवरून 70 रुपयांवर गेली तर  2017 मध्ये पुन्हा एकदा पेट्रोलची किंमत प्रति लिटर 70 रुपयांवरून 63 रुपयांवर आली.  त्यानंतर आता 2018 च्या सुरूवातीपासून कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या.  इंधनाच्या दरात होणारी ही वाढ  येत्या काही दिवसांत वाढत्या किंमतींमुळे विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर मोठी समस्या निर्माण करेल, असा अंजाड त्यावेळी  जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनी वर्तवला होता. 

पहा...जनतेचा आवाज...फक्त साम टिव्हीवर..

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com