मेहुल चोक्सीचं तुरुंगातलं छायाचित्र झालं प्रसिद्ध

Mehul Chowksy
Mehul Chowksy

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील PNB Scam प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी Mehul Chowkshi याचे तुरुंगातील छायाचित्र अँटिग्वाच्या Antigua एका स्थानिक न्यूज एजन्सीनं प्रसिद्ध केलं आहे. या छायाचित्रात जाळीच्या आत मेहुल चोक्सी दिसत असून त्याचा हातही सुजलेला दिसत आहे. Fugitive In PNB Scam Mehul Chowksi Picture Surfaced in Media

दरम्यान, चोक्सीला देशात India परत आणण्यासाठी एक खासगी जेट अँटिग्वामध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. त्याला अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीही दुजोरा दिला आहे. 

पंजाब नॅशनल बँकेच्या १४००० कोटी रुपयांच्या घोटाळा  प्रकरणात फरारी असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी Mehul Choksi याला डाॅमिनिकामध्ये गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला भारताच्या ताब्यात दिले जाईल, असे अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितले आहे. Fugitive In PNB Scam Mehul Chowksi Picture Surfaced in Media

चोक्सी २०१८ मध्ये देश सोडून फरारी झाला होता. ६२ वर्षांचा चोक्सी क्यूबाला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले. अँटिग्वा आणि बारबुडा येथून चोक्सी गेल्या आठवड्यापासून गायब होता. तो येथे असल्याचे समजल्यानंतर सीबीआयनं त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली होती. त्यानंतर तो गायब झाला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोक्सी डाॅमिनिका या छोट्याशा राष्ट्रात बोटीद्वारे पोहोचला होता. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटिस काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने  स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले आहे. सध्या तो त्यांच्या कस्टडीत आहे. त्याला अँटिग्वाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. Fugitive In PNB Scam Mehul Chowksi Picture Surfaced in Media

दरम्यान, चोक्सी हा अँटिग्वाच्या विरोधी पक्षाला मदत करत होता, असा आरोप अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी केला आहे. त्यामुळेच इथल्या विरोधी पक्षानं चोक्सीला पाठिंबा देणारं पत्रक जाहीर केलं असंही ब्राऊनी यांनी म्हटले आहे. आपल्याला भारताकडे प्रत्यार्पित करण्यास चोक्सीनं विरोध केला आहे. त्याच्या अर्जावर येत्या बुधवारी (ता. २) सुनावणी होणार आहे. 

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com