खाकीतला देव माणूस, ज्ञानदेव वारे

जयश्री मोरे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिथे रक्ताचे नातेवाईकही दुरावले, अशावेळी केवळ तोंडाला मास्क आणि हातात हॅन्ड ग्लोव्हस घालून पोलिस नाईक ज्ञानदेव वारे यांनी 500 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. तर आता पर्यंत 50 हजार बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. हिंदूचे हिंदू धर्मानुसार, तर मुस्लिम बांधवांचे बडा कब्रस्तान येथे दफनविधी केले. शवगृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा कुजलेला, छिन्नविछिन्न झालेल्या त्याच्या शरीराचे भाग उचलून ते शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा, कधी बाप तर, कधी भाऊ बनून मृतदेहांंना अग्नी द्यायचा, हा जणू त्यांचा दिनक्रमच झाला होता. ​

मुंबई - कोरोनाच्या Corona सुरुवातीच्या काळात जिथे रक्ताचे नातेवाईकही दुरावले, अशावेळी  केवळ तोंडाला मास्क आणि हातात हॅन्ड ग्लोव्हस Hand Golves घालून पोलिस नाईक ज्ञानदेव वारे Dyandev Ware यांनी 500 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. तर आता पर्यंत 50 हजार बेवारस मृतदेहावर unclaimed bodies अंत्यसंस्कार केले. हिंदूचे हिंदू Hindu धर्मानुसार, तर मुस्लिम Muslim बांधवांचे बडा कब्रस्तान येथे दफनविधी केले. शवगृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा कुजलेला, छिन्नविछिन्न झालेल्या त्याच्या शरीराचे भाग उचलून ते शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा, कधी बाप तर, कधी भाऊ बनून मृतदेहांंना अग्नी द्यायचा, हा जणू त्यांचा दिनक्रमच झाला होता.  Funeral on 50 thousand unclaimed bodies

मुंबई पोलीस Mumbai Police दलातील अंमलदार ज्ञानदेव वारे  यांच्या या अविरत सेवेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सेवेत त्यांनी  50 हजाराहुन अधिक बेवारस मृतदेहांंना अग्नी दिला. कोरोना काळातही त्यांची ही सेवा अविरत सुरू आहे. ताडदेव पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले ज्ञानदेव वारे हे १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रूजू झाले. चेंबूरमध्ये ते पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहतात. सुरुवातीची ६ वर्षे त्यांनी पोलीस ठाण्यात सेवा बजावली.

२००० मध्ये रजेवरून कर्तव्यावर रूजू होताच त्यांना शववाहिनीवर चालक म्हणून जबाबदारी दिली. कुठल्या अनोळखी व्यक्तिला आपण त्याचा जवळचा नातेवाईक म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे याचे माेल केलेच जाऊ शकत नाही. यातून खूप माेठे समाधान मिळते, असे वारे म्हणतात,वारे यांचे कार्य पाहून पोलिस दलाने त्यांची दखल घेतली आहे. विश्वास नांगरे-पाटील Vishwas Nangare Patil सह आयुक्त कायदा सुव्यवस्था यांनी पोलिस दला तर्फे वारेनां 5 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना बढ़ती देखील देण्यात आली आहे. Funeral on 50 thousand unclaimed bodies

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live