शाहिद जवान प्रमोद कापगते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 27 मे 2021

दरम्यान, प्रमोद कापगाते हे 2001 मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते.  त्यांनी नुकतेच आपल्या सेवेचा पहिला टप्पा गाठत देश सेवेचे 20 वर्षे 10 एप्रिलला पूर्ण केले होते.

नागालँडमध्ये (Nagaland) उग्रवादी आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गोंदिया (Gondia) जिल्हयाच्या सडक अर्जुनी, तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी, गावातील शहीद जवान प्रमोद कापगते, यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.  या जवानावर आज गुरूवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आपल्या वीरजवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो नागरीक गर्दी करीत पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला.  शहीद प्रमोद कापगते  यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,आई ,वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. (Funeral of Shahid Jawan Pramod Kapgate in a state funeral)

हे देखील पाहा 

दरम्यान, प्रमोद कापगाते हे 2001 मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते.  त्यांनी नुकतेच आपल्या सेवेचा पहिला टप्पा गाठत देश सेवेचे 20 वर्षे 10 एप्रिलला पूर्ण केले होते. प्रमोद हे सेवानिवृत्ती घेऊन या महिन्यात स्वगावी परत येणार होते असल्याची माहिती त्यांनी आपल्या पत्नी आणि कुटूंबियांना फोनद्वारे दिली होती. तसे कागद पत्रे देखील त्यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्याकडे दिली होते. मात्र सेवानिवृत्ती घेतल्यावरही ते कर्तव्यावर कसे रुजू होते? आणि  त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? हे मात्र कुटूंबियांना स्पष्ट कळू शकलेले नाही. काल सकाळी साडे सहा वाजे दरम्यान सैन्य दलाच्या एका अधिकऱ्याने फोन करीत प्रमोद कापगते, हे शहिद झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कापगते कुटुंबियांना धक्का बसला होता.


संबंधित बातम्या

Saam TV Live