केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार कविता 

Saam Banner Template
Saam Banner Template

प्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra Modi) होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यांत ही भाजप ला विजय मिळालेला आहे. (Funny poem by Union Minister Ramdas Athavale on Prashant Kishor)

त्यामुळे माझे म्हणणे आहे 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी' असे ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) आज मुंबईत संविधान निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले असल्याचे रिपाइंद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

हे देखील पाहा

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 3 तास चर्चा झाली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत एकत्र काम करेल.  

Edited By : Pravin Dhamale  

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com