दारुड्याचा नागाशी खेळ, कोब्रा 4 चार वेळा डसला

SAAM TV
शनिवार, 13 मार्च 2021

दारुड्याचा नागाशी खेळ
कोब्रा 4 चार वेळा डसला
नागाशी मस्ती दारुड्याला भोवली

नाशिकच्या नांदूरमधमेश्वर गावात सापाशी खेळ करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. सापानं चार वेळा तरुणाला दंश केला. साप चावल्यानं तरुणाची प्रकृती गंभीर झालीय.

नाशिकच्या नांदूरमधमेश्वरच्या झेडपी शाळेत नाग घुसला होता. या नागाला पाहण्यासाठी गर्दी गोळा झाली होती. गर्दीत मंगेश गायकवाडही होता. तो दारु प्यायला होता. दारुच्या नशेत मंगेशनं सापाला पकडलं. व्हायचं तेच झालं. नाग माघारी फिरला आणि त्यानं दंश केला. एक दोन नव्हे चार वेळा नागानं चावा घेतला. नागानं हाताभोवती वेटोळं घातलं होतं. साप चावल्यानंतर त्यानं त्याला ठेचण्याचा प्रयत्न केला. विष शरीरभर पसरु लागलं. अत्यवस्थ झालेल्या मंगेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

प्रशिक्षण नसेल तर साप हाताळूच नका. अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती करणं आलं अंगलट
नागाने 4 वेळा चावा घेतल्यानं तरुण अत्यावस्थ, रुग्णालयात उपचार सुरू. मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती एका तरुणाच्या चांगलंचं अंगलट आलंय. निफाड तालुक्यातील नांदूरमध्येश्वरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. चार वेळा नागाने चावा घेतल्याने या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरूयत. मद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचं भान अनेकांना राहत नाही, अशीच एक घटना घडलीय,  निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वरमध्ये. मद्यप्राशन केलेल्या मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच नागाला पकडून त्याच्याशी मस्ती सुरू केली.  यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. या मस्ती दरम्यान नागाने मंगेशला चार वेळा चावा घेतल चावा घेतल्याच्या रागात मंगेशनं नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला, यावेळी मंगेशला नागाने चावा घेतल्याने मंगेशची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. अद्यापही त्याची प्रकृती चिंताजनक असून सध्या तो मृत्यूशी झुंज देतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live