मुंबई बाजार समितीत याययंच....कोविड RTPCR चाचणी करा!

विकास मिरगणे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

एप्रिलपासून नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रवेशासाठी कोविड चाचणी नकारात्मक असल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे

नवी मुंबई : मुंबई Mumbai कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट कोरोनाचे Corona हॉटस्पॉट Hotspot झाले आहे. अनेक कामगार व व्यापारांचा मृत्यू होऊन सुद्धा मार्केट मधील गर्दी कमी होत नाही.आता २६ तारखेपासून नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रवेशासाठी कोविड Covid चाचणी नकारात्मक असल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. Game with in the market committee of Navi Mumbaikars

सध्या मार्केट परिसरात बाजार समितीतील घटकांसाठी ऐच्छिक कोविड ॲँटिजेन चाचणी केली जात आहे. मात्र २६ तारखेपासून खरेदीदारांना आणि बाजार समितीच्या आवारात प्रवेश करणा-या प्रत्येकाला नागरिकांस कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. ॲँटिजेन रिपोर्ट किंवा १५ दिवसांसाठीचा आरटीपीसाआर रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार आहे.त्याचप्रमाणे मार्केटमध्ये मद्ये सुरू असलेली किरकोळ विक्री बंद करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहे.

एपीएमसी मार्केटमधून संपूर्ण एमएमआर क्षेत्रात अन्नधान्य, भाजीपाला, फळे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या मार्केटमध्ये येणा-या पाचही बाजार समितींमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने खरेदीदार, किरकोळ व्यापारी येत असतात. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live