VIDEO | बुरखाधारी महिलेनं फोडल्या गणेशमुर्ती, पाहा व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

VIDEO | बुरखाधारी महिलेनं फोडल्या गणेशमुर्ती, पाहा व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

एका मुस्लिम महिलेनं देवाचा अपमान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि देशभरात संतापाची लाट उसळली. देवाचा अपमान करणारी बुरखाधारी महिला कोण? ही महिला आहे तरी कुठली? असे संतप्त सवाल उपस्थित केले जातायत. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेजही व्हायरल होत असल्याने आम्ही या व्हिडीओची पडताळणी केलीय. मग काय सत्य समोर आलं पाहा...


व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

गणपती सण तोंडावर असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून, तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत बघा. दोन बुरखाधारी महिला एका सुपरमार्केटमध्ये दिसतायत. या महिला आपली खरेदी सोडून सुपरमार्केटमधील विक्रेत्याला गणेशमूर्ती विक्रीसाठी का ठेवल्यात याचा जाब विचारतायत. तर एक महिला कसलाही विचार न करता गणेशमूर्ती खाली ढकलून देतेय.

हा धक्कादायक, वेदनादायी, आणि देवाचा अपमान करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं या महिलेच्या कृत्याचा जगभरातून निषेध केला जातोय. अल्पसंख्याक हिंदूंवर कोण अन्याय करतंय? ही महिला कोण आहे? ही घटना नेमकी कुठली आहे? असे संतप्त सवाल सोशल मीडियावरून विचारले जातायत...

अल्पसंख्याक हिंदूंवर जगभरात अन्याय?

या व्हायरल व्हिडीओमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता सांगणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही महिला कोण आहे? तिनं असं कृत्य का केलं? हिंदू धर्माचा इतका द्वेष ही महिला का करतेय? याची सत्यता जाणून घेत असताना आम्हाला संपूर्ण माहिती मिळाली. त्यावेळी या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं.

  • देवाचा अपमान करणारा हा व्हिडीओ भारतातला नाहीए
  • हा धक्कादायक प्रकार बेहरीनच्या राजधानीत घडलाय
  • एका मुस्लिम देशामध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी का ठेवल्यात असा या महिलेचा आक्षेप आहे
  • एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आता या महिलेवर कारवाई झालीय

गणपती सण तोंडावर आल्याने हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओनंतर कट्टरता वाद्यांनी मात्र या महिलेचं अभिनंदन केलंय...हे कितपत योग्य आहे. आता या महिलेवर बेहरीनच्या पोलिसांनी कारवाई केलीय. तिला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, तुम्ही समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका. पण, परराष्ट्रमंत्रालय या घटनेची दखल घेईल का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी, बेहरीनच्या राजाला खडेबोल सुनावतील का ? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com