यंदा  पाणीटंचाईमुळे  लातूरमध्ये गणेश विसर्जन होणं अशक्य 

यंदा  पाणीटंचाईमुळे  लातूरमध्ये गणेश विसर्जन होणं अशक्य 

काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे. बहुतांश ठिकाणी विहिरीत आणि धरणात पाण्याचा थेंबही नाही. जेथे पाणी आहे ते पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार असल्याने मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.                                   सार्वजनिक गणेश उत्सवाची शतकी परंपरा पाळणाऱ्या लातूर शहरामध्ये यंदा पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पहिल्यांदाच गणेशमूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या ठरलेल्या मार्गावरून मिरवणुका काढाव्यात. मात्र, गणेशाचे विसर्जन करू नये, असे आवाहन येथील महापालिका उपायुक्तांनी केले आहे.  सार्वजनिक गणेश मंडळांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनी विनंती केल्यास त्यांना मूर्तीचे दान द्यावे किंवा  जे गणेशाची मूर्ती तयार करतात अशा मंडळींना त्या मूर्ती दान कराव्यात .

              शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेकडे गणपतीची मूर्ती दान करावी. मात्र, शहरात कुठेही गणपती विसर्जनासाठी अट्टहास धरू नये, असे आवाहन  महापालिकेने केले आहे. यंदा लातूरमध्ये सप्टेंबरअखेर  नळाने पाणी देता येईल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत पिण्यासाठी आरक्षित करण्यात येत आहेत. गणेश विसर्जनासाठी शहरातील पारंपरिक विहिरीमध्येही यावर्षी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे  विघ्नहर्ता पाण्याचे संकट दूर करेल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, या दहा दिवसातही पुरेसा पाऊस झाला नाही.  घरगुती गणेशाचे विसर्जन न करता प्रत्येकाने वर्षभर मूर्ती घरीच ठेवून द्यावी.

Web Title: Ganesh Immersion In Latur Is Impossible This Year

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com