जावई -सासऱ्याच्या बोलबच्चन गँगच्या आवळल्या मुसक्या....

जयश्री मोरे
गुरुवार, 10 जून 2021

मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्याचा तपास करताना ह्या टोळीला जेर बंद केले आहे.

जावई आणि सासरा चालवत असलेल्या एका खतरनाक टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोनसाखळी चोर आणो बोलबच्चन गॅंगच्या नावाने दहशत असलेल्या 5 आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.  या आरोपींच्या मागावर मुंबई पोलीस तर होतेच त्याच सोबत अनेक राज्यांचे पोलीस ही त्यांचा शोध घेत होते. हैद्राबाद ,बंगलोर, कलकत्ता, भोपाळ, दिल्ली, अश्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केले आहेत.  मात्र ते पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हते.  

मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्याचा तपास करताना ह्या टोळीला जेर बंद केले आहे.  दुचाकी वरून येऊन सोनसाखळी चोरणे किंवा पोलीस असल्याची बतावणी करून बोलबच्चन देत वृद्धांना लुटणे असे गुन्हे यांच्या नावावर आहेत.  यातील दोघे नात्याने सासरा आणि जावई आहेत. ह्या टोळीला अटक केल्यानंतर आतापर्यंत सुमारे 100 ग्राम सोने हस्तगत केले आहे. (The gang in Mumbai is gone)

हे देखील पाहा

आरोपी मुझुम फैयाज उर्फ जग्गु , कासीम हैदर सय्यद इराणी, तालिब इराणी, जाफरणी इराणी, सादिकली जाफरी यांना अटक केली असून त्यांच्याकडून 100 ग्राम सोने हस्तगत केले असून अजून लुटलेली मालमत्ता हस्तगत होईल आणि गुन्हेगारीला आळा लागू शकतो.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live