येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ -गडकरी

येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ -गडकरी

तिरोडा (जि. गोंदिया) - येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते निर्माण होताना त्यासाठी लागणारी माती, मुरूम हे मामा तलाव, शेततळे, नाला, नदी, खोलीकरण, रुंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील सिंचन क्रांतीचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयातील पटांगणात शनिवारी (ता. २३) पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, गोरेगावचे नगराध्यक्ष आशीष बारेवार, तिरोडा नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, मुख्याधिकारी विजय देशमुख, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, बाळू मळघाटे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारने साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्‍न सुटला तर, ७५ टक्‍के प्रश्‍न सुटतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक आमदार विजय रहांगडाले यांनी, तर संचालन मदन पटले यांनी केले.

Web Title: Ganga River Water Clean in march Nitin Gadkari

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com