गंगामाईचे झाले सलग दुसऱ्या वर्षी आगमन

अमोल कलये
शनिवार, 1 मे 2021

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे Ganga सलग दुसर्‍या वर्षी लॉकडाऊनच्या Lock Down काळात आगमन झाले आहे. उन्हाळे तीर्थक्षेत्री  गंगामाईचे आगमन झाले.

रत्नागिरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे Ganga सलग दुसर्‍या वर्षी लॉकडाऊनच्या Lock Down काळात आगमन झाले आहे. उन्हाळे तीर्थक्षेत्री  गंगामाईचे आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे.  गतवर्षी १५ एप्रिल, २०२० मध्ये गंगामाईचे आगमन झाले होते. Gangamai Arrived second Consecutive year in Ratnagiri 

त्यानंतर अनेक दिवस वास्तव्य केल्यानंतर २१ जून रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. गंगामाईचे तब्बल १ वर्ष १४ दिवसांनी  उन्हाळे गंगीतीर्थस्थानी आगमन झाले.  गंगामाईचे आगमन झाल्यानंतर गंगामाई चांगली प्रवाहीत असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे Water प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहीत आहे. 

गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्यासंख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. गंगामाईचे आगमन आणि निर्गमनाचे विज्ञानालाही कोडे सुटलेले नाही. गतवर्षी  लॉकडाऊनच्या काळात १५ एप्रिल April रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर यावर्षीही पंधरा दिवसांनी पुढे म्हणजे ३० एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले असून वर्षभरामध्ये एकाच महिन्यामध्ये पंधरा दिवसांच्या फरकाने गंगामाईचे आगमन झाले आहे. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live