मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या....

Gas cylinder prices fell
Gas cylinder prices fell

नवी दिल्ली : १ जूनपासून सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price) कमी करण्याचा मोठा  निर्णय घेतला आहे. IOC ने १९  किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या (LPG Price Today) किंमतीत थोडा दिलासा दिला आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र, कोणताही बदल केल नाही. परंतु, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत Rate कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये किमतीत कमी ही झाली नाही, आणि वाढही झाली आहे. दरम्यान १९ किलोग्रॅमच्या सिलेंडरचे दर याआधी मे महिन्यात कमी करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत या महिन्यातही कोणताच बदल झाला नाही.

इंडेन कंपनीचे ग्राहक ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल Call करावे. एलपीजी गॅस सिलेंडरचं बुकिंग करू शकतात. याशिवाय या ग्राहकांना WhatsApp वर REFILL असं लिहून ७५८८८८८८२४ या क्रमांकावर पाठवलं तर सिलेंडर रिफिल करता येणार आहे. याकरिता तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असणं आणि त्यावरुनच तुम्ही WhatsApp मेसेज करणं गरजेचं आहे.

हे देखील पहा 

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अनुक्रमे ८०९ रुपये, ८०९  रुपये, ८३५.५ रुपये,८२५ रुपये आहे. IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मुंबईमध्ये १ जून रोजी १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत १२२.५ रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर १९KG च्या गॅस सिलेंडरची मुंबईतील किंमत १४२२.५ रुपये झाली आहे. मे मध्ये हा दर १५४५ रुपये इतका होता. मे मध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९  किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत ४५.५ रुपयांनी कमी केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com