गॅस महागला, तेल महागलं आणि आता मसालेही महागल्यानं सामान्यांना चांगलाच ठसका

साम टीव्ही
मंगळवार, 16 मार्च 2021

गॅस महागला, तेल तापलं... आता मसाले तडतडले
महाराष्ट्रासह देशभरात मसाल्यांचे दरही गगनाला
मसाल्याच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या

 

 

 

 

 

तेलाच्या किमतींनी बजेट करपवून टाकलेलं असतानाच, त्यात आता मसाल्यांच्या फोडणीची भर पडलीय. कारण, दररोजच्या स्वयंपाकात लागणारे मसालेही महागलेयत त्यामुळे तेलाने होरपळवलं आणि मसाल्यांनी करपवलं अशी अवस्था सामान्य नागरिकांची झालीय.

महागाईचा राक्षस पेट्रोल पंपांवर छळतोय. नंतर या महागाईने घरगुती गॅसचे दरही आभाळाला पोहोचवले.नंतर तेलाच्या कढईपर्यंत महागाईने मजल मारलेली असतानाच आता मसाल्यांचे पदार्थांचे दरही आता चांगलेच तडतडलेयत.कारण रोजच्या वापरातील जिरे, मोहरीसह सर्वच मसाल्यांचे पदार्थ तब्बल 15 टक्क्यांनी महागलेयत.

निष्काळजीपणाचा कळस, असला बेजबाबदारपणा तुमच्याच अंगलट येईल..

महागाईची फोडणी बसल्याने मसाल्याचे पदार्थ आधी किती होते आणि आता किती झालेत त्यावर एक नजर टाकूयात.
 
जिरे आधी 150 ते 155 रुपये प्रतिकिलो होते, मात्र आता जिऱ्याचे दर 165 ते 190 रुपयांवर पोहोचलेयत.  त्याचप्रमाणे, धने आधी प्रतिकिलो 75 रुपयांनी मिळत होते, तेच धने आता 80 रुपये प्रतिकिलोने मिळू लागलेयत. तसेच आधी 450 रुपये किलोने मिळणारी लवंग आता 520 रुपयांवर पोहोचलीय. मसाल्यात नेहमी वापरलं जाणारं दगडफूल आधी 800 रुपये किलोने मिळायचं त्याचे दर आता 1 हजार 400 रुपयांवर पोहोचलेयत.

 

ही सगळी परिस्थिती पाहता, भडकलेली महागाई आता सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचलीय. आधीच आर्थिक वाळवी लागलेलं सामान्यांच बजेट आता करपून गेलंय. महागाईच्या फोडणीनं तेल तापलेलं असताना त्यात मसाल्यांच्या दरवाढीची भर पडलीय. त्यामुळे, गृहिणींच्या बजेटला महागाईचा ठसका लागलाय, एवढं नक्की. साम टीव्ही 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live