चक्क 135 रुपयांत लग्न! पाहा मुकबधीर जोडप्याचा हा आदर्श उपक्रम

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

अवघ्या 135 रुपयांत लग्न
सव्वा लिटर पेट्रोलच्या किंमतीत लग्न
ना बँडबाजा, ना वरात, साधेपणात लग्नाची गाठ

 

 

विवाह सोहळा म्हटले की, लाखोंचा खर्च, पाहुणे, बँड बाजा आलाच. पण यवतमाळमधील एका लग्नात अवघे १३५ रुपये खर्च आला. हा लग्नसोहळा लग्नात उधळपट्टी करणाऱ्यांसाठी आदर्श आहे.

धामधुमीत लग्न करणाऱ्यांची संख्या कमी नाही. कर्ज काढीन पण लग्न करीन अशी म्हणच रुढ झालीय. खोट्या प्रतिष्ठेपोटी स्वतःभोवती कर्जाचा फास लावून घेणारे कमी नाहीत. याला अपवाद आहे यवतमाळच्या राजेश आणि मंगलाचं लग्न. अमरावतीचा राजेश बोरकर आणि यवतमाळच्या कामठवाडा इथल्या मंगला श्रीरामजीकर हे मूकबधीर आहेत. दोन्हीकडचं आर्थिक स्थिती नाजूकच यावर उपाय म्हणून दोन्हीकडच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवत साधेपणानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. निवडक वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साधेपणानं पण उत्साहात पार पडला. लग्नासाठी खर्च किती आला तर फक्त 135 रुपये.

 अवघ्या 135 रुपयांमध्ये राजेश आणि मंगला रेशीमगाठीत अडकलेत. या हटके लग्नाचं इतरांनी अनुकरण केल्यास नवरा-नवरीच्या घरच्या कोणाच्याही गळ्यात कर्जाचा फास अडकणार नाही. साम टीव्ही 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live