तरुणीची फेसबुकद्वारे बदनामी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जळगाव : तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट तयार करत मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव पोलिसांत तक्रार झाल्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन पोलिस पथकाने नाशिक रोड येथील रहिवासी "सडकछाप मजनू'स अटक केली आहे. 

चाळीसगाव शहरातील उच्चशिक्षित सुप्रिया (काल्पनिक नाव) ही तरुणी काही वर्षे नाशिकमध्ये शिक्षणासाठी होती. याची माहिती संशयितास असल्याने त्याने नाशिकच्या तिच्या मैत्रिणीच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर मुलींचे फोटो टाकून नंतर तक्रारदार तरुणीशी मैत्री केल्यावर तिचा मोबाईल नंबर मिळवून चॅटिंगद्वारे मेसेज टाकण्यास सुरवात केली होती. मॅसेजद्वारे बळजबरी करून तिचे क्‍लब केलेले फेक फोटो फेसबुकवर टाकून बदनामी केली. तसेच वेगवेगळ्या तीन मोबाईलद्वारे मेसेज व फोन करून करून त्रास दिला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे या दोघांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर नाशिक रोड येथील लखन प्रितमदास चावला याला शोधून काढले असून रात्री त्याला ताब्यात घेत अटक करून जळगावी आणण्यात आले आहे. 

तरुणीचे लग्न मोडण्याची धमकी 
पोलिसांनी नाशिक रोड येथून अटक केलेल्या लखन प्रीतमदास चावला या तरुणाने तिची फेसबुक फ्रेन्ड असलेल्या तक्रारदार तरुणीला ब्लॅकमेलिंग करून येत्या काही महिन्यात होत असलेले लग्न मोडण्यापर्यंत मजल गाठली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठत अखेर तक्रार केल्यावर पोलिसांनी संशयितास अटक केली.

संबंधित बातम्या

Saam TV Live