चार मुलींनी दिला आईच्या प्रेताला खांदा तर पाचव्या मुलीने दिला मुखाग्नी....!

beedc
beedc

बीड : समाजातील रूढी-परंपरांना Traditions मूठमाती देत, चार मुलींनी Girls जन्मदात्या आईच्या Mother अर्थीला खांदा दिल्याची घटना बीडमध्ये घडली. एवढेच नाही तर पाचव्या मुलीने मुखाग्नी देत सर्व विधी Rituals पार पाडले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकात हा अंत्यविधी Funreal पार पडला आहे. Girls Performed The Funeral

हे देखील पहा -

बीडच्या Beed शिरुर कासार तालुक्यात असणाऱ्या जांब येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे या महिलेचे वृध्दापकाळाने काल पहाटे निधन झाले. त्यात लक्ष्मीबाई यांना मुलगा नसल्याने खांदा कोण देणार ? मुखाग्नी कोण देणार ? अशी चर्चा सुरू असताना लहान मुलगी समोर आली आणि मी मुखाग्नी देते म्हणाली. तर चार मुलींनी खांदा देण्याचं ठरवलं त्यात कोरोना मुळे कमी नातेवाईक मंडळी हजर असल्याने लोकांनी देखील मान्य केले.

लक्ष्मीबाई यांच्या 4 मुली सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या मुलींनी खांदा दिला. तर कचराबाई खंडागळे या मुलीने उर्वरित सर्व तयारी केली. अंत्ययात्रा निघताना पाणी ताट घेऊन स्मशानाकडे शंकुतला सुतार या लहान मुलीने मार्गक्रमण करत नेले. त्याठिकाणी गावातील मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर लक्ष्मीबाई यांच्या प्रेतास तिने अग्नी दिला.Girls Performed The Funeral

या घटनेमुळे गावात व आसपासच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी हा  पुरुष आहे अशी समज मोडीत काढत, या पाच बहिणींनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.

मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार, स्वर्गाच द्वार उघणार का ? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो. असे अनेक गैरसमज आजही ग्रामीण भागात आहेत. याला छेद देत या पाच मुलींनी आईचा अंत्यसंस्कार केला आहे.Girls Performed The Funeral

परंपरेची बंधने झुगारून धाडस दाखवणाऱ्या या पाच बहिणींचे कौतुक होत आहे. तसेच मुला पेक्षा मुलगी देखील काही कमी नाही हे दाखवून देत. सर्व जबाबदाऱ्या बखुबीने पार पाडत या मुलींनी आदर्श ठसा उमटवला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com