कोरोना व्हॅक्सिनच्या तुटवड्यावर नितीन गडकरी यांचा मोठा सल्ला म्हणाले...

nitin gadkari
nitin gadkari

नवी दिल्ली:  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी आज केंद्राला देशातील कोरोना व्हॅक्सिनच्या Corona Vaccine तुटवड्यावर मोठा सल्ला दिला आहे. देशातील अन्य कंपन्यांनाही कोरोना लसीचा परवाना दिला गेला पाहिजे. कोरोनाची लस बनविण्याचे लायसन्स तुम्ही एका ऐवजी दहा कंपन्यांना द्या, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे. Give licenses to more companies to make corona vaccines says Nitin Gadkari 

नितीन गडकरी यांनी मीडियाशी Social Media संवाद साधताना हा असा सल्ला दिला आहे. व्हॅक्सीनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कोरोनावरील व्हॅक्सीन बनविणाचे लायसन्स एका कंपनी ऐवजी दहा कंपन्यांना दिले गेले पाहिजे. आधी या कंपन्यांना भारतात व्हॅक्सीनचा पाहिजे तेवढा पुरवठा करू द्या. त्यानंतर व्हॅक्सीन जास्त असतील तर त्या त्या  ठिकाणी  निर्यात करा, असं गडकरींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हे देखील पहा -

प्रत्येक राज्यात दोन तीन मोठ्या लॅब आहेत. त्यांना व्हॅक्सिनची निर्मिती करण्याची तुम्ही परवानगी देऊ शकता. केवळ तुम्हाला सेवा करायची म्हणून व्हॅक्सिनची निर्मिती करून घेऊ नका. तर त्यांना दहा टक्के रॉयल्टी देऊन व्हॅक्सिन निर्मिती करण्यास सांगा. तुम्हाला 15 ते 20 दिवसात हे सगळ करता येऊ शकेल, असेही ते म्हणाले आहेत. Give licenses to more companies to make corona vaccines says Nitin Gadkari 

मृतदेहांवरील अंत्यसंस्काराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह आणि शहर विकास मंत्र्यांना प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंदनाच्या लाकडा ऐवजी  इथेनॉल, बायोगॅस, डिझेल आणि वीज आदी इंधनाद्वारे अंत्यसंस्कार केले पाहिजे. यामुळे तर अंत्यसंस्कारासाठी येणारा खर्च कमी होईल आणि लवकरात लवकर अंत्यसंस्कारही होतील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com