लाॅकडाऊन लावताय? जनतेला तीन दिवसांचा अवधी द्या....

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज्य सरकार येत्या काळात कधीही लॉकडाऊन लावू शकते. त्या अनुषंगाने डॉ. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

मुंबई: राज्य सरकारने Maharashtra लॉकडाऊन Lockdown जाहीर करताना नागरिकांना कमीत कमी तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे Neelam Gohrey यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. या अवधीत नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतील. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे डॉ. गोऱ्हेयांनी म्हटले आहे. Give a three day period when announcing the lockdown Request of Neelam Gorhe

कोरोनाचा Corona फैलाव रोखण्यासाठी सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार येत्या काळात कधीही लॉकडाऊन लावू शकते. त्या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. गोरगरीब मजूर, दैनंदिन हजेरीवर काम करणारे मजूर, तसेच निराधार लोकांना किमान महिनाभर पुरेल इतके धान्य रेशनवर उपलब्ध करून देण्यात यावे, असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी दरडोई 3 हजार रुपये जमा करावेत, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची 'वर्क स्पॉट डिलीव्हरी'साठी परवानगी द्यावी, राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे इतर औषध वापरासंदर्भात तज्ञ डॉक्टर व आयसीएमआरशी सल्लामसलत करावी, अशा सूचना त्यात करण्यातत आल्या आहेत.

प्रत्येक जिह्यातील शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा सुरू करण्यासाठी सीएसआरबरोबरच आमदार निधीचाही वापर कारण्यात यावी अशी मुभा द्यावी, अशा विविध मुद्यांकडे लक्ष वेधून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला सर्वसामान्यांचा विचार करण्यास भाग पडले आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live