चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरणारी टोळी गजाआड..

The goat theft gang was caught by the police
The goat theft gang was caught by the police

सांगली : कोण कशाची चोरी, आणि कशासाठी कशातून होईल, याचा काही नेम उरला नाही. सांगलीच्या Sangli इस्लामपूर Islampur मधील एका टोळीकडून केवळ चैनीसाठी आणि विशेष म्हणजे आलिशान गाडीतून या टोळीकडून बोकड- शेळ्या चोरण्याचा उद्योग करण्यात येत होता. केवळ चैनीसाठी बोकड चोरी केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण पोलिसांनी Police या बोकड चोरी टोळीचा पर्दाफाश करत ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. The goat theft gang was caught by the police 

एकीकडे मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. ६०० रुपये किलो दराने जवळपास मटणाची विक्री सुरू आहे. बोकड Buck- शेळ्यांना चांगली मागणी आहे. नेमकी हीच बाब ओळखून आपली चैनी भागवण्यासाठी या शेळ्या Goats- बोकडांची चोरी करण्याचे उद्योग सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरामधील शेळी आणि बोकड चोरीच्या घटना कायम सुरुच  होते. 

इस्लामपूर पोलिसांकडून कसून चौकशी करताना चौकशी दरम्यान, नरसिंहपूर Narsinghpur येथील एका टोळीकडून या शेळी आणि बोकड चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या टोळीच्या ५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शेळया आणि  बोकड चोरी केल्याची कबूली दिली आहे. The goat theft gang was caught by the police

हे देखील पहा  

या प्रकरणी अजित पांडूरंग सुर्वे (वय २९), अजय रघुनाथ झीमुर (वय २९), अभिषेक कैलास गोतपागर (वय ३०), धनंजय आनंदा कांबळे (वय २९) आणि किरण दिपक लोहार (वय २९) या ५ जणांना अटक करत त्यांच्याकडून ३ बोकड व १ शेळी आणि या शेळी चोरीसाठी वापरण्यात येणारी आलिशान गाडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल आहे.

Edited By- Digambar Jadhav


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com