ओबीसी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी गावागावात जाणार - पंकजा मुंडे

विनोद जिरे
गुरुवार, 3 जून 2021

तीन पक्षाचे सरकार तीन दिशाने ओढत आहेत. त्यामुळं विरोधी पक्षात एकत्र वज्रमुठ करायची आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून शांत असणाऱ्या पंकजा मुंडे यांनी, दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आता मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. असं म्हणत गोपीनाथ गडावरूनच संघर्षाच रणसिंग फुंकले आहे. आज दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर ऑनलाइन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे पोस्टल इनोलोपचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक माजी मंत्री महादेव जानकर ,खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका रांजळे, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.(Going to villages to give justice to OBCs and Maratha community - Pankaja Munde)

पंकजा मुंडे पुढे म्हणाले, की हे गोपीनाथ मुंडे स्मारक आपल्या मुलींनी वडिलांसाठी बांधलं आहे. जगात महामारी पसरलीय, आपण 10 हजार कुटुंबाना राशन देत आधार दिला. आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. आज अनेक मराठा समाजातील बांधव फोन करून म्हणतात ताई मुंडे साहेब म्हटले होते मी आरक्षण मिळवून देईल. मात्र आज आरक्षणाच्या नावावर सर्वांनी आपल्या पोळ्या भाजण्याचं काम सुरू केलंय. हे सरकारचं आरक्षणाची कोर्टामध्ये भूमिका मांडतांना  अपयशी झाले आहे. मोर्चा काढायचा म्हटलं की निवडणूक आली अस लोक सांगत आहेत. आज किती टक्के आरक्षण मराठा समजला देता ते सांगा. पुढारी जाती आणि धर्माच्या भिंती उभ्या करतात. असा टोला पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरून लगावलाय.

छत्रपती संभाजीराजेचं रायगडावर न येण्याचं आवाहन ; शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा 

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेलाय. कोरोना खेड्या वस्ती तांड्यात गेला,चांगली लोकं दगावली आहेत. मात्र आज काय सुरूय आपल्याकडे, आरोग्य यंत्रणेत सांगळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणचाही गोंधळ सुरूय. जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र सरकारला कोरोना संदर्भात गांभीर्य नाही.

आता ओबीसी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी गावागावात जाणार आहे. फक्त मोर्च्यापुढे जाऊन फोटो काढायचा नाही मला. सर्व विषयांना हाताळताना गावागावात जाऊन अन्यायाला वाच्या फोडून, शिवाजी पार्क भरवायचा आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. निवडणुका व्हायच्या असतील तर अगोदर हे सर्व प्रश्न मार्गी लावा. असंही त्या म्हणाल्या.

कोरोनाची लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

तीन पक्षाचे सरकार तीन दिशाने ओढत आहेत. त्यामुळं विरोधी पक्षात एकत्र वज्रमुठ करायची आहे. धार आणि आधार देण्यासाठी सामान्य माणसापर्यंत पोचायच आहे. ओबीसी, मराठा आरक्षणवरून अन्याय केला आहे. तुम्ही पंतप्रधान यांच्याशी संवाद साधा. त्यांना मन की बात मध्ये दखल घ्यावी लागेल. मराठा समाजाला न्याय मिळला पाहिजे. यासाठी मोदींना पत्र पाठवा. मी सुद्धा एक पत्र लिहिलं आहे. असं आवाहन देखील मुंडे यांनी केलंय.

दरम्यान, ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून, महाराष्ट्रभर गावागावात फिरून, वंचित उपेक्षित समाजाला न्याय देणार आहे. असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, गोपीनाथ गडावरुन एक प्रकारचं संघर्षाचं रनसिंग फुंकले आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live