सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण, सोनं आणि चांदी 1 हजारानं स्वस्त

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020
  • सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण
  • सोनं आणि चांदी 1 हजारानं स्वस्त
  • सोनं 51 हजार 300 वरून 50 हजार 300 रुपयांवर
  • 2 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण

2 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत सोन्याच्या दरात चांगलीच चढ-उतार पाहायला मिळत होते. साधारण 4 ते 5 दिवसांपासून सोन्याचे भाव घसरतायत. 

मंगळवारनंतर बुधवारीही एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झालीय.

हेही वाचा-

अंडी 100 रुपये डजन होणार? अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झाला नाही? वाचा काय घडलंय...

सोनं 51 हजार 300 वरून 50 हजार 300 तर चांदी 62 हजार रुपयांवरून 61 हजार रुपये अशी घसरलीय. पितृपक्षात भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिकमासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झालंय. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झालीय. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढले. परिणामी आठवडाभरात चांदीचे भाव वाढून ते ६८ हजार रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ५२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. मात्र आता अधिक-मासात या दोन्ही धातूंचे भाव कमी-कमी होत आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live