लग्नसराईत सोनं झाल स्वस्त

साम टीव्ही
सोमवार, 1 मार्च 2021

लग्नसराई सुरु असताना सोनं स्वस्त झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून पन्नास हजारांच्या वर असलेलं सोनं साडे सेहेचाळीस हजार रुपये तोळ्यांवर आलंय.

लग्नसराई सुरु असताना सोनं स्वस्त झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून पन्नास हजारांच्या वर असलेलं सोनं साडे सेहेचाळीस हजार रुपये तोळ्यांवर आलंय. पुढचे काही दिवस सोन्याचे भाव असेच राहतील असा अंदाज आहे. लग्नसराईत अनपेक्षितरित्या सोनं स्वस्त झाल्यानं खरेदी वाढणार आहे.

लग्नसराई सुरु असताना सोनं स्वस्त झालंय. लॉकडाऊनच्या काळात पन्नास हजारांच्या वर गेलेलं सोनं आता स्वस्त होऊ लागलंय. गेल्या काही महिन्यातला सोन्याचा हा निचांक आहे. सोनं ४६ हजार ६०० रुपये तोळा झालंय. चांदीही 68 हजार रुपये किलोवर आलीय.

सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोने व चांदीचे दर वाढतात, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु, यावर्षी सुवर्णबाजारात उलट परिस्थिती आहे. लग्नसराई सुरू असताना सोने व चांदीचे दर घसरले आहेत. घटलेली मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेला सट्टा ही त्या मागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. अशा परिस्थितीत लग्नाचे दागिने तसेच आभूषणांना मागणी कमी झाली आहे. याचाही सुवर्ण बाजारावर परिणाम झाला आहे.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live