तिन्ही गोल्ड मॅन काळाच्या पडद्याआड

साम टीव्ही
बुधवार, 6 मे 2020

 

  • तिन्ही गोल्ड मॅन काळाच्या पडद्याआड
  • सोन्यासारख्या माणसांना लागली कुणाची नजर?
     

गोल्ड मॅन... रमेश वांजळे यांच्यासोबत हा शब्द महाराष्ट्रात प्रचलित झाला.. आणि पुण्यात गोल्ड मॅनची क्रेझ निर्माण झाली. पण दुर्दैव असं आहे, की लोकांमध्ये क्रेझ निर्माण करणारे हे तिन्ही गोल्डमॅन काळाच्या पडद्याआड गेलेत..

रमेश वांजळे पुण्याचे पहिले गोल्डमॅन राजकारणात आल्यानंतर गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. मैं दिखता हूॅ व्हिलन जैसा मगर काम करता हूॅं हिरो का,` या डायलॉग त्यांना शोभला. पण 2011 साली वयाच्या 46व्या वर्षी त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. 

वांजळे यांच्या नंतर 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता फुगे नवे गोल्ड मॅन ठरले. त्यांच्या सोन्याच्या शर्टची सर्वत्र चर्चा झाली. मात्र राजकारणात एँट्रीच्या विचारात असताना त्यांचं अनेकांशी वितृष्ट झालं. आणि यातूनच त्यांची 2014 साली दडगाने ठेचून हत्या झाली.

पुण्यातील तिसरा प्रसिद्ध गोल्डनमॅन व उद्योजक म्हणजे सम्राट हिरामण मोझे. त्यांचे वयाच्या 34 व्या वर्षी हृदयविकाराने 5 मे रोजी निधन झालं... 

आणि याबरोबरच पुण्यातला तिसरा गोल्डमॅन सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला. 

एकाएकी या तिन्ही गोल्डमॅनच निघून जाणं हे सर्वांसाठीच धक्कादायक ठरलं. आणि तितकंच आश्चर्याचं सुद्धा. आयुष्याचं एका वेगळ्या अर्थानं सोन करणारी ही तिन्ही माणसं अल्पायुषी ठरली, हेच काय ते दुःख.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live