आईच्या नावाने दान द्या म्हणत, दोन चोरट्यांनी केले आजीचे गंठण लंपास...

रोहिदास गाडगे
बुधवार, 19 मे 2021

माझी आई आजारी असुन मला आईच्या नावाने पाच हजाराच्या वस्तु दान करायच्या आहेत. मात्र मंदिर बंद असल्याने आजी तुमच्या हातुन दान करायचे असे सांगुन, भाजी विक्रेत्या महिलेचे 1 लाख 80 रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हातचलाखी करत चोरले आहे.

पुणे : माझी आई आजारी असुन मला आईच्या नावाने पाच हजाराच्या वस्तु दान करायच्या आहेत. मात्र मंदिर बंद असल्याने आजी तुमच्या हातुन दान करायचे असे सांगुन, भाजी विक्रेत्या महिलेचे 1 लाख 80 रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हातचलाखी करत चोरले आहे. दोन दरोडेखोरांनी हे गंठण चोरल्याची घटना आळेफाटा Aalefata येथील राजुरी Rajuri गावात घडली असुन चोरीचा प्रकार सीसीटीव्ही CCTV कॅमेरात झाला आहे. हौसाबाई भागाजी घंगाळे (वय ५५) आजीच्या तक्रारीवरुन आळेफाटा पोलीसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A gold necklace worth Rs 1 lakh 80 thousand has been stolen from a woman

आळेफाटा येथील राजुरी येथील चावडी समोर आज सकाळी हौसाबाई घंगाळे छोट्याश्या टपरीमध्ये भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. सफेद रंगाच्या दुचाकीवरून दोन तरुण भाजी खरेदीच्या बहाण्याने आले. भाजी खरेदी करत असताना मोटारसायकलवर मागे बसलेला तरूण आजीला म्हणाला, माझी आई आजारी असुन मला पाच हजाराच्या वस्तु दान करायच्या आहेत. मला भाजी विकत घ्यायची आहे. माझ्यासमोर एक कापडी पिशवी ठेवली यामधील वस्तु मला दान करायच्या आहेत. मी जे दान करणार आहे त्या पिशवीमध्ये तुम्ही तुमचे गळ्यातील दागिने काढुन ठेवा. आम्ही गेल्यावर त्या पिशवीतील दागिने काढुन घ्या असे सांगितले.

हे देखील पहा -

त्यावेळी भोळ्यापणात आजी हौसाबाईने गळ्यातील मंगळसूत्र त्या पिशवीत ठेवले त्यानंतर तरुणाने पिशवीला गाठ मारुन पिशवी आजीकडे दिल्यानंतर दोघे निघून गेले. त्यानंतर पिशवीची गाठ उघडली असता त्यामध्ये एक नारळ, दोन बिस्किट पुडे व तीन दगडाचे तुकडे निघाले त्यावेळी आजीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरडाओरड केला मात्र तोपर्यंत चोरटे मोटारसायकल वरुन पसार झाले.  A gold necklace worth Rs 1 lakh 80 thousand has been stolen from a woman

रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; सहकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली 

राजुरी चावडी समोरील मंगळसूत्र चोरीचा प्रकार तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज घेतले असून या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live