सोन्याचा भाव घसरला  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

 

 

नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा उच्चांक गाठत सोने तोळ्यामागे ३९, ८८५ रुपयांवर पोहोचले होते. त्यात आता घसरण होऊ लागली आहे. गेल्या तीन दिवसांत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल २,३०० रुपयांनी पडला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या भावानंही उच्चांक गाठला होता. चांदी किलोमागे ५१,४८९ रुपयांवर गेली होती. मात्र, हा भाव ५ हजार रुपयांनी कमी होऊ ४७,३१० रुपयांवर स्थिरावला आहे. गेल्या काही दिवसांत अचानक उसळलेले सोन्याचे दर घसरू लागले आहेत. सलग तीन दिवसांपासून ही घसरण सुरू असून आज २४ कॅरेट सोन्याचा दर २७० रुपयांनी घसरून ३८,४५४ रुपयांवर आला आहे. चांदीची चकाकीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

Web Title :: Gold prices fell


  


संबंधित बातम्या

Saam TV Live