पुढच्या वर्षी पुन्हा सोन्यात तेजी 

पुढच्या वर्षी पुन्हा सोन्यात तेजी 

नवी दिल्ली: सोन्याच्या किमतीत पुढच्या वर्षी पुन्हा तेजी परतण्याची शक्यता आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये सोन्याच्या किमती मर्यादित प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे जगभरातील बऱ्याच केंद्रीय बँकांनी आपले पतधोरण काहीसे शिथिल केले आहे. त्यामुळे सोन्यासारख्या कमी जोखमीच्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढण्याची शक्यता आहे.


'मेटल्स फोकस'च्या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचा प्रभाव अंदाजापेक्षा अधिक पाहण्यास मिळत आहे. याचे महत्त्वाचे कारण अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढण्याची शक्यताही असल्याचे 'मेटल्स फोकस'ने म्हटले आहे. सोन्याला अजूनही सुरक्षित संपत्ती म्हणून पाहिले जाते. आर्थिक संकट ओढवल्यानंतर आणि महागाईमुळे दरवाढ झाल्यानंतर संपत्तीचे मूल्य वाचविण्यासाठी सोन्याची मदत होते.

'ब्लुमबर्ग'च्या मते वर्ष २०२०मध्ये सोन्याचा प्रति औंस सरासरी भाव १४९४ डॉलरवर राहण्याची शक्यता आहे. चालू वर्षात सोन्याचा भाव प्रति औंस १४०२ डॉलरच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा सात टक्के अधिक आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये सोन्याचा भाव १४७४ डॉलरवर राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. सोन्याचा हा भाव देशांतर्गत किमतीशी जोडला गेला तर, तो ८.६ टक्क्यांनी वधारून प्रति दहा ग्रॅमला ३८,१२२ रुपयांवर पोहोचला आहे. लंडनमध्ये मौल्यवान धातूंविषयी सल्ला देणारी कंपनी 'मेटल्स फोकस'ने धातूंच्या संदर्भातील प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये जगभरातील बड्या केंद्रीय बँकांकडून अधिक उदार धोरणाची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बाँड यील्डमध्ये घसरणा होऊन सोन्यासारखा सुरक्षित साधनातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.


जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत देशातील सोन्याची एकूण आयात ५०२.९ टनांवर पोहोचली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही आयात ५८७ टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत २२ टक्क्यांची वाढ झाल्याने मागणी घटली. दरवर्षी देशात सरासरी ७५० ते ८०० टन सोन्याची विक्री होते. चालू वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये देशात ४९६.१ टन सोन्याची विक्री झाली. याच कालावधीत चीन, हाँगकाँग आणि तैवानमध्ये मिळून ६७७.४ टन सोन्याची विक्री झाली.


 

Web Title:  gold rate will increase next year
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com