गोंदियातुन लवकरच इंदौर, हैदराबाद विमानसेवा

airline(15).jpg
airline(15).jpg

गोंदिया : गोंदियाच्या Gondia  बिरसी Birsi येथील इंग्रजकालीन विमानतळावर उभारण्यात आलेल्या सुसज्ज विमानतळावरुन Airport आता प्रवासी विमान सेवा सुरु होणार आहे. प्रवासी विमानसेवेकरिता विमानतळ सज्ज होते, मात्र विमान कंपन्या तयार नव्हत्या. मात्र आता येत्या काही दिवसांतच मध्यप्रदेशातील इंदौर Indore  आणि हैदराबादकरिता Hyderabad येथून प्रवासीसेवा सुरू होणार आहे. यासाठी खासदार सुनील मेंढे Sunil Mendhe यांनी विशेष प्रयत्न केले आहे. Gondia to Indore, Hyderabad Airlines soon

बिग चार्टर एअर लाईन्स (फ्लाय बिग) या कंपनीने बिरसी विमानतळावरून मध्यप्रदेशातील इंदौर- गोंदिया- हैदराबाद आणि हैदराबाद ते गोंदिया- इंदौर येथे प्रवासी विमानसेवेला हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे गोंदिया जिल्हा आता चार्टर विमानसेवेने जोडला जाणार आहे.

 हे देखील पहा -

प्रायोगिक तत्वावर 60 ते 70 आसन क्षमता असणारे विमाने सोडण्यात येणार आहेत.  ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना विमानसेवेकरिता नागपूर आणि रायपूरला जाण्याचा त्रास वाचणार असून गोंदिया हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याची सिमा गोंदियाला लागून आहे. Gondia to Indore, Hyderabad Airlines soon

त्यामुळे बालाघाटला जाणारे व्हीव्हीआयपी बिरसी येथील विमानतळावरच उतरतात. यानंतर देखील येथून चार्टर विमानसेवा सुरू झाल्यास त्याचा लाभ गोंदिया जिल्ह्यासह बालाघाट जिल्ह्याला देखील मिळणार आहे. 

Edited By : Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com