रेल्वेने दारू तस्करी करणाऱ्या व्यक्तीस गोंदिया पोलिसांनी केली अटक

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

लॉकडाउन काळात रेल्वेने दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस गोंदिया रेलवे पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया पोलिस रेल्वे विभागात पेट्रोलिंग करत असतांना आरोपी सूचित रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आला होता. 

गोंदिया: लॉकडाऊन Lockdown काळात रेल्वेने दारूची तस्करी  Liquor Smuggling  करणाऱ्या एका आरोपीस गोंदिया रेल्वे पोलिसांनी Railway Police अटक केली आहे. तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव सूचित रामटेके (वय 34) असे सांगण्यात आले आहे. आरोपी मूळचा दुर्ग छत्तीसगढ़ Chattisgarh येथील आहे. Gondia police arrested a man who smuggling liquor by train

गोंदिया पोलिस रेल्वे विभागात पेट्रोलिंग Petrolling करत असतांना आरोपी सूचित रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर हावड़ा कड़े जाणाऱ्या रेलवे गाडीत एक मोठी बॅग घेऊन तो सूचित चढत असताना दिसुन आला. त्याच्यावर संशय आला असता त्याचा पाठलाग केल्यावर तो पळू लागला. त्याला अत्यंत हुशारीने पोलिसांनी पकडले आहे.

अटक करून त्याच्या जवळ असलेली बॅग पोलिसांनी नीट तपासली. तेव्हा त्याच्याकडून देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या आहेत. दारूच्या बॉटल आढळल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली  असून त्याच्यावर दारू तस्करी बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Sanika Gade

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live