शिवनेरीला आले ‘अच्छे दिन’

शिवनेरीला आले ‘अच्छे दिन’

मुंबई : ८ जुलैपासून शिवनेरीची भाडेकपात करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक फेरीला तीन ते चार हजार प्रवासी वाढले. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीमध्ये प्रवासी संख्या वाढली

मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचे तिकीट दर ८० ते १०० रुपये कमी केल्याने, मागील ७५ दिवसांत तब्बल ६० हजार प्रवासी वाढले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

मागील १० वर्षांपासून एसटीचा ‘शिवनेरी’ हा ब्रँड मुंबई पुण्याच्या मध्यमवर्गीयांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. सध्या ११८ बसच्या माध्यमातून सरासरी २७५ फेºया मुंबई ते पुणे या मार्गावर होतात. शनिवार ते सोमवार या दिवशी जास्त फेºया चालविण्यात येतात. दादर ते पुणे स्टेशन या मार्गावर दर पंधरा मिनिटाला सकाळी ५ पासून रात्री ११ पर्यंत शिवनेरी धावत असते, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

वाढलेले तिकीट दर आणि ओला-उबेरसारख्या टॅक्सीसेवेशी स्पर्धा, यामुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येमध्ये प्रचंड घट झाली होती. त्यामुळे एसटीच्या वाहतूक विभागाने दर कपातीच्या प्रस्ताव एसटीच्या संचालक मंडळाकडून मंजूर करून घेतला. ८ जुलैपासून शिवनेरीची कमी दरातील सेवा मुंबई ते पुण्याच्या विविध मार्गांवर सुरू झाली. पहिल्या दिवसापासून शिवनेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेच्या अनियमित फेऱ्यांमुळे शिवनेरीने जास्त उत्पन्न कमावले होते.


Web Title: 'Good day' from Mumbai to Pune Shivneri
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com