कोरोना लसीबाबत आनंदाची बातमी!

साम टीव्ही
शनिवार, 12 सप्टेंबर 2020
  • कोरोनावर लवकरच मिळू शकते लस ? 
  • भारत बायोटेकच्या लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी
  • कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी
  • कोरोना संकटात दिलासादायक बातमी

कोरोना संकटात एक आशा पल्लवित करणारी बातमी...भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या चाचणीला परवानगी मिळाली.. त्यामुळे कोरोनावर लवकरच लस मिळण्याच्या शक्यतेला वेग आलाय. भारतासह सारं जग कोरोना लसीची प्रतीक्षा करतंय. अशातच भारत बायोटेकनं ही आनंदाची बातमी दिलीय.

 कोरोनावर लस कधी येणार याची सारं जग प्रतिक्षा करतंय. ऑक्सफर्डनं आपल्या चाचणीला तात्पुरती स्थगिती दिलीय. अशातच भारतातून एक सकारात्मक बातमी आलीय. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झालीय. या लसीच्या दुसऱ्या टप्प्याला आता मंजुरी देण्यात आलीय. 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार  कोव्हॅक्सिनची माकडांच्या चार समूहांवर चाचणी करण्यात आली. यावेळी माकडांना SARS-CoV-2 चे दोन डोस देण्यात आले तसच त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. 14 दिवसांत या माकडांना 3 वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या. चाचणीअंती माकडांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोना व्हायरसचा प्रभाव नष्ट झाल्याचं लक्षात आलं. ज्या समुहांना लस देण्यात आली त्यांच्या हिस्टो-पॅथोलॉजिकल टेस्टमध्ये निमोनियाची कोणतीही लागण दिसली नाही. 
ICMRच्या माहितीनुसार भारतात तोनी कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीची दुसरी आणि तिसरी चाचणी सुरूंय. तर भारत बायोटेकच्या दुसऱ्या चाचणीला सुरूवात होईल. जेड्स कैडिलाच्या दुसऱ्या टप्प्यात 50 जणांवर लसीची चाचणी करण्यात आलीय. 

तुर्तास सीरमच्या लसीची चाचणीही थांबवण्यात आलीय. असं असलं तरी भारत बायोटेकनं कोव्हॅक्सिनबाबत समाधानकारक बातमी दिलीय. त्यामुळे ही लस आता प्रत्यक्ष कधी येते, याकडेच सर्वांचे डोळे लागले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live