कोरोना लशीबाबत आनंदाची बातमी, ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड लस लवकरच येणार? 

साम टीव्ही
रविवार, 11 ऑक्टोबर 2020
  • कोरोना लशीबाबत आनंदाची बातमी
  • ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड लस लवकरच येणार? 
  • लशीच्या ट्रायलमध्ये कोणतेही दुष्परिणाम नाही

कोरोनावर लस कधी येणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण, आता कोरोनाची लस लवकरच येणार आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र, हे खरं आहे. कोणती आहे ही लस? आणि कधी येणार चला पाहुयात.

कोरोना लशीबाबत एक पॉझिटीव्ह बातमी. आता लवकरच कोरोना लस येणाराय. ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्ड लशीवरील चाचणी यशस्वी झालीय. लशीच्या ट्रायल्स अनेक ठिकाणी घेण्यात आल्या. त्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीयेत. त्यामुळं कोरोनावर लस लवकरच येईल अशी आशा व्यक्त केली जातेय. प्रत्येक देश कोरोना लशीबाबत संशोधन करतायत. अजूनही यशस्वी लस आलेली नाही. पण, कोव्हिशिल्ड लशीच्या यशस्वी चाचणीमुळं दिलासा मिळालाय.

कोरोनाने अनेकांना देशोधडीला लावलंय. लस कधी येणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय. पण, कोविशिल्ड लशीबाबत यशस्वी चाचणी झालीय.

  • 25 सप्टेंबरपासून लशीची चाचणी सुरू करण्यात आली
  • लस दिल्यानंतर 97 स्वयंसेवकांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं
  • 25 सप्टेंबरपासून आजपर्यंत 65 जणांवर लशीची चाचणी केली
  • 53 जणांना लशीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत
     
  • आता फेज 2 आणि 3 ची चाचणी करण्यासाठी 300 स्वयंसेवक सहभाग घेणार आहेत. ऑक्सफर्डच्या कोव्हॅक्सिनची चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच ही लस येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे गेले 7 महिने कित्येकांना घरी बसावं लागलंय. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यायत. ही लस लवकर उपलब्ध झाली तर कोरोना महामारीतून बाहेर पडता येणं शक्य आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live