गुड न्यूज! देशाला मार्चपर्यंत मिळणार कोरोना लस, वाचा सीरम इन्स्टिट्यूटची ही माहिती

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020
  • गुड न्यूज! कोरोनाची लस लवकरच येणार 
  • देशाला मार्चपर्यंत मिळणार कोरोना लस 
  • सीरम इन्स्टिट्यूटचा अंदाज

देशासाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता मार्चपर्यंत कोरोनाची लस मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरमनंच तसं स्पष्ट केलंय. जर सर्वकाही योग्य दिशेने सुरू राहिलं तर भारताला मार्च 2021 पर्यंत कोरोनावरील लस मिळू शकणाराय. प्रशासनाने जर लवकर मंजुरी दिली तर ते शक्य आहे. अनेक कंपन्या या लसीवर काम करतायत. भारतात हे संशोधन वेगाने सुरु आहे. देशात दोन कोरोना लसींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तर एका लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरुय. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीपर्यंतच कोरोनाविरोधात लस तयार व्हायला हवी, अशी आशा व्यक्त केली जातेय.

लसीकरणात प्रथम प्राधान्य कुणाला?

  • भारतात पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याची योजना
  • लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य कोरोनाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना
  • त्यासोबत पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि वयोवृद्धांचा लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य
  • वयोगटानुसार कोरोना लसींना मंजुरी दिली जाणाराय. दरम्यान कोरोना लसीच्या वितरणाबाबत सरकारने तयारी सुरु केलीय. एकापेक्षा जास्त कोरोना लसींना मंजुरी मिळण्याची शक्यताय. त्यामुळे पुढील वर्षात कोरोना लस मिळणार हे आता निश्चित झालंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live