कोरोना लशीबाबत खूशखबर , महिनाअखेरीस लस उपलब्ध होण्याची शक्यता

साम टिव्ही
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

 

  • कोरोना लशीबाबत खूशखबर
  • फायजरच्या लशीची चाचणी 90 टक्के यशस्वी
  • महिनाअखेरीस लस उपलब्ध होण्याची शक्यता
     

अमेरिकेच्या फायजर कंपनीच्या लशीची चाचणी 90 टक्के यशस्वी झालीय. त्यामुळे कोरोना संकटात सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

संपूर्ण जग कोरोना संकटानं होरपळून निघालंय. कोरोनानं जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक कोरोना लशीची वाट पाहत आहेत. मात्र, आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीनं कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केलाय. फायजर लसीची ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे या लसीकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त प्रभावी हे औषध ठरल्याचा दावा करण्यात आलाय.
फायनल वीओ - फायजरची लस पूर्णपणे यशस्वी ठरली तर या महिन्याच्या अखेरपर्यंत लसीला बाजारात विक्रीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही लस खरच यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला फार मोठा दिलासा मिळेल हे मात्र निश्चित.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live