अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी ! अकोल्यात सहा दिवसांत 4024 रुग्ण कोरोनामुक्त

covid19
covid19

अकोला - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दररोज वाढत्या रुग्णांचा नवा विक्रम प्रस्थापित करणारा कोरोना संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसापासून अकोल्यात Akola कोरोना रुग्णांपेक्षा रुग्ण कोरोनामुक्त Corona free होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र एप्रिलच्या शेवटचा आठवडा अकोलेकरांसाठी दिलासादायक म्हणावा लागेल मात्र मृत्युदर Death rate कमी करण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान आहे. Good news for Akolekars

 कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना किंचित दिलासा देणारी बाब आशेचा किरण म्हणून समोर येत आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली असून, गत सहा दिवसांत 4024 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2,914 नवे पॉझिटिव्ह  Positive रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी डिसेंबर अखेरीस घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा उंचावला, ही लाट एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्च पातळीवर पोहोचली. दररोज शंभर ते दोनशेच्या घरात नोंदविली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या 500 ते 700 पर्यंत जाऊन ठेपली. सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. 

अकोल्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात तर कोरोनाने कहरच केला रुग्णसंख्ये बरोबर मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटचा आठवडा अकोला जिल्ह्यासाठी थोडा का होईना दिलासादायक म्हणावा लागेल.  कारण या आठवड्यात गेल्या पाच दिवसांपासून रुग्णवाढीपेक्षा कोरोना वर मात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. Good news for Akolekars

एकाच आठवड्यात अकोल्यात 4024 रुग्णांनी कोरोना वर मात केली तर 2,914 नव्या रुग्णांची नोंद झालीय. लाट जरी ओसरत असली तरी अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी संपूर्ण कोरोना मुक्तीसाठी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नियम पाळण्याचे आवाहन प्रशासन नियमित करत आहे. दरम्यान मेच्या पहिल्या आठवड्यात आणखी दिलासा देणारी बातमी येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com