अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी; कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 17 टक्के वाढ

mango
mango

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Second Wave) कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेसाठी (Economy) चांगली बातमी आहे. या आर्थिक पेचप्रसंगी गेल्या एका वर्षात कृषी आणि त्याशी संबंधित उत्पादनांच्या (Agricultural Products) निर्यातीत 17 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. पहिल्यांदाच आंब्याची टॉप व्यरायटी बहरीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांत पाठविला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना संकटाने अर्थव्यवस्थेची कंबर तुटली होती.  बरीच महत्त्वाची क्षेत्रे अजूनही त्याच्या परिणामाशी झगडत आहेत.  परंतु, कोरोनाच्या या कहरात कृषी उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे.

गुरुवारी वाणिज्य सचिव अनिल बधावन यांनी आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, 'कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. सन 2020-21 मध्ये कृषी व त्या संबंधित उत्पादनांची निर्यात 41.25 अब्ज डॉलरवर पोचली आहे. हे 2019-20 च्या तुलनेत 17.34 टक्के जास्त आहे. बधावन यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या काही महिन्यांत कृषी निर्यातिची ही योशोगाथा आहे. आंब्याचा व्यापार वाढत आहे, त्याचबरोबर त्याचे निर्यातही नव्या देशांना होत आहे.(Good news for the economy Exports of agricultural products increase by 17 percent)

हे देखील पाहा

वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बिहार आणि बंगाल येथून बहरीन येथे 16 उच्च दर्जाचे आंबे निर्यात करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. यात 3 जीआय प्रमाणित- खिरसापती आणि लक्ष्मणभोग (पश्चिम बंगाल) आणि बिहारच्या जरदालु आंबा यांचा समावेश आहे. प्रथमच बंगानपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे अडीच अडीच मेट्रिक टन दक्षिण कोरियाला पाठविण्यात आले आहेत. तथापि, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे आंब्यांची निर्यात क्षमतेनुसार केली जात नसल्याचे आंबा व्यापारी सांगत आहेत. एप्रिल आणि मेमध्ये ज्या पद्धतीने लॉकडाउन लागू केला होता त्याचा आंबा व्यवसायावर परिणाम झाला आहे. या लॉकडाउनमध्ये सामान्य व्यापाऱ्यांची पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com