GoodNews! घर आणि वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

साम टीव्ही
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020
  • घर खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
  • स्टॅम्प ड्युटीत तब्बल 3 टक्क्यांची कपात
  • स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्के
  • 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत स्टॅम्प ड्युटी 3%
  • राज्यातील व्यावसायिक वाहनांना रस्ते करमाफी
  • 11.4 लाख व्यावसायिक वाहनांना करमाफी

मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी.. स्टॅम्प ड्युटीत तब्बल 3 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. ठाकरे सरकारनं घर खरेदी करणाऱ्यांना हा दिलासा दिलाय. 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्के करण्यात आलीय. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत स्टॅम्प ड्युटी 3 टक्के असणार आहे. त्यामुळे घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. 

मच्छिमारांप्रमाणेच ठाकरे सरकारनं वाहतुकदारांनाही दिलासा दिलाय. वाहतुकदारांना सरसकट रस्ते करमाफी देण्याची घोषणा करण्यात आलीय. वाहतुकदारांना १ एप्रिल २०२० ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत संपूर्ण टॅक्समध्ये माफी देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील ११ लाख ४० हजार वाहनांना फायदा होणार आहे. या रस्ते करमाफीमुळे ७०० कोटी रुपयांचा भार मात्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live