खुशखबर ! होमलोन होणार स्वस्त

खुशखबर ! होमलोन होणार स्वस्त

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने आता सक्तीचा बडगा उगारला आहे.

ऑक्टोबर महिन्यातच दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार आहे. रेपो रेटशी व्याजदर संलग्न केल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कर्जांवरील व्याजदर आपोआप कमी होणार असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता कमी बसणार आहे.बँकांनी येत्या 1 ऑक्टोबरपासून त्यांचे नवे बदलते (फ्लोटिंग) गृहादी कर्ज व्याजदर हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दरांशी निगडित ठेवावेत, तसेच वाहन, लघू उद्योगांसाठीही अशी रेपो दर संलंग्न व्याजदर उत्पादने असावीत असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर बदलाचा थेट व त्वरित लाभ कर्जदारांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

यापूर्वी अनेकदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी केले नाहीत. स्टेट बँकेसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. 1 एप्रिलपासून बँकांनी रेपो संलंग्न दर करण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. अखेर आता त्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.

 बँकेने कर्जावरील व्याजासह ठेवींवरील व्याजदरही ०.१० टक्के प्रमाणात कमी केले आहेत. बँकेचे सर्व कालावधीसाठीचे व्याजदर आता ‘एमसीएलआर’शी निगडित करण्यात आले आहेत. नवे दर १ सप्टेंबरपासूनच लागू होत आहेत. बँकेने एप्रिल २०१९ पासून ०.२० टक्केपर्यंत व्याजदरात कपात केली आहे. आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर केली आहे.


Web Title:Good news! Homeowners will be cheaper

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com