भाड्यानं घर घेताय? तर घरमालकांसाठी चांगली आणि भाडेकरुंसाठी वाईट बातमी!

साम टीव्ही
शनिवार, 5 डिसेंबर 2020
  • केंद्र सरकार आदर्श घरभाडं कायदा आणण्याच्या तयारीत
  • भाडेकरुंना बाजारभावानं भाडं द्यावं लागणार ?
  • पागडीनं राहणाऱ्या भाडेकरुंना धक्का बसणार 

मुंबई : आता घरमालकांना दिलासा देणारी बातमी.. केंद्र सरकार आदर्श घरभाडे कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे घरभाड्याच्या गणितात बदल होणार आहेत.

घरमालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे कारण केंद्र सरकार लवकरच आदर्श घरभाडं कायदा आणणार आहे.या कायद्यामुळे अवघ्या 20 ते 30 रुपये महिना भाडं देत पागडी पद्धतीनं राहणाऱ्या भाडेकरुंना धक्का बसणार आहे. 

कसा असेल नवा कायदा ?

  1. केंद्र सरकारच्या प्रस्तावित आदर्श भाडे करार कायद्यानुसार भाडेकरुंना बाजारभावाने भाडं द्यावं लागेल
  2. या कायद्यामुळे घरमालकांना करार संपल्यानंतर चौपट भाडं वसूल करण्याचा अधिकार देण्यात आलाय.
  3. मालकाकडे पागडीपद्धतीनं राहणाऱ्या भाडेकरुंना प्रस्तावित कायद्यामुळे धक्का बसणार आहे.
  4. पागडी पद्धतीनं अवघ्या १०-२० रुपये भाडं देऊन राहणाऱ्या भाडेकरुंमुळे इमारतींचा पुनर्विकास कसा करायचा असा प्रश्न येत होता. भाडं आकारण्यासाठीची पागडी पद्धत सदनिकेच्या दुरुस्तीसह इमारतींच्या पुनर्विकासात अडसर ठरत होती पण आता प्रस्तावित कायद्यामुळे हा अडसर दूर होण्याचा दावा करण्यात येतोय. आशा करुयात की नवीन प्रस्तावित कायद्यामुळे घरमालक आणि भाडेकरुंच्या हिताची जपणूक होईल.
     


संबंधित बातम्या

Saam TV Live