खूशखबर! पुण्यात आजपासून ऑक्सफर्ड लसीची चाचणी, देशभरातून 1600 स्वयंसेवक सहभागी

साम टीव्ही
बुधवार, 26 ऑगस्ट 2020
  • खूशखबर.. पुण्यात आजपासून ऑक्सफर्ड लसीची चाचणी
  • लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात सुरु
  • देशभरातून 1600 स्वयंसेवक सहभागी

कोरोना लसीसंबंधी एक आनंदाची बातमी. कोपोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात सुरु झालीय. पाहुयात काय आहे लसीसंबंधीची अपडेट.

कोरोना लसीसंबंधीची सर्वात मोठी दिलासादायक अपडेट पुण्यातून समोर येतेय. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात सुरु झालीय. भारती विद्यापीठ हॉस्पिटल अँड रिसर्ट सेंटर इथं लसीची चाचणी सुरु झालीय. देशाच्या विविध शहरातून 1600 स्वयंसेवक यात सहभागी होणार आहेत.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन ही लस निर्माण केलीय. ज्या स्वयंसेवकांना लस दिली गेलीय, त्यांना कोणते साईड इफेक्ट्स आहेत का, त्यांना आरोग्याबाबत कोणता धोका निर्माण झालाय का याचं विश्लेषण पुढच्या आठ दिवसात होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live