गुडन्यूज! मुंबई महापालिकेत मेगाभरती

गुडन्यूज! मुंबई महापालिकेत मेगाभरती

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे.परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 


 महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे.

Web Title :: Good news! Recruitment for 2 seats in Mumbai Municipal Corporation


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com