खुशखबर ! वाचा राज्य सरकार कुठे करणार मेगाभरती  

खुशखबर ! वाचा  राज्य सरकार कुठे करणार मेगाभरती  


मुंबई : मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करू नये. कारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपटट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आठ मोठे अनुभवी अधिकारी काम करत आहेत. तसेच काही अधिकारी, संस्था यामध्ये काम करत आहेत. आमदारानाही यामध्ये सहभागी करण्यात येत आहे. पण मुंबई महापालिकेने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातही भरती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. माझ्या आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे गुण, अंतर्गत परिक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत. 

मुंबईमध्ये लॉकडाऊन रेडझोन असल्याने त्यावर निर्णय घेण्यात येईल. कन्टेन्मेंट झोनबाहेर काही दुकाने उघडता येतील का, यावर मुख्यमंत्री येत्या १८ तारखेला निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. 

राज्यभरात कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १५००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 


WebTittle :: Good news! The state government will soon do mega recruitment

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com