Good News - लहान मुलांवरील लसीच्या चाचण्यांना नागपुरात सुरुवात

मंगेश मोहिते
रविवार, 6 जून 2021

आज पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांना दिली जाणार लस. लस घेणाऱ्या पालक आणि मुलांमध्ये उत्साह; सगळ्या मुलांच्या ट्रायल पूर्वी करण्यात आल्या चाचण्या. 

नागपूर : 12 ते18 वयोगतातील मुलांवर कोव्हॅक्सिन Covaxin लसीचे ट्रायल नागपूर Nagpur मधील मेडीट्रीना हॉस्पिटल मध्ये आज पासून सुर झाले आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 या वयोगटातील लहान मुलांना आज ट्रायल सुरू करण्यात आली आहे. Good News Vaccine tests on children begin in Nagpur

पेट्रोलच्या दरात 'विकास' सुरूच !

ज्या मुलांना लस देण्यात येत आहेत. त्या मुलांची काल तपासणी करण्यात आली आहे. या चाचणीसाठी 50 मुलांना सिलेक्ट करण्यात आले आहे. संपूर्ण भारतामध्ये 175 मुलांना पहिला ट्रायल डोस दिला जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 50 मुलांना हि लस देण्यात येत आहे.

संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हि ट्रायल Trial करण्यात येत आहे यामध्ये दिल्ली पटना आणि त्यानंतर नागपूर ची निवड झालेली आहे. ज्या मुलांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या त्यांना आज लस देण्यात येत आहे. पहिला डॉस दिल्यानंतर 28 दिवसाच्या नंतर दुसरा डोस देण्यात येईल पण.या कालावधीत मुलानं वर संपूर्ण टीम लक्ष ठेऊन असेल.

हे देखील पहा -

लस घेतलेल्या मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये मात्र लस Vaccine घेतल्यानंतर आनंदाचे वातावरण आहे.  Good News Vaccine tests on children begin in Nagpur

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live