अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

blood donation
blood donation

अमरावती: अमरावती Amravati जिल्हा महसूल कर्मचारी एकता संघातर्फे आज रक्तदान शिबिराचे Blood donation आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात प्लाझ्मा Plasma आणि रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.Good response to blood donation campaign in Amravati

या शिबिराला रक्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संघाचे कार्याध्यक्ष विजय सांगळे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

हे देखील पहा -

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय Collector Office परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रक्तदानाला सुरुवात झाली. सर्वात पहिले जिल्हाधिकारी Collector शैलेश नवाल यांनी रक्तदान केले. त्यानंतर महसूल विभागाच्या प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करायला सुरुवात केली. 

कोविड Covid काळात उपचारादरम्यान रक्ताची पुरेशी उपलब्धता असावी. गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठी विविध संस्था-संघटना पुढे येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल कर्मचारी एकता संघातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते. प्लाझ्मा उलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संघाने पुढाकार घेत हे शिबिर आयोजित केले आहे. आताही गरजूंना प्लाझ्मा आणि रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com