GOODNEWS | महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावला 

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 19 जून 2020

जागतिक पातळीवर थैमान घालत असलेला करोना विषाणू महाराष्ट्रात ९ मार्चला पोहोचला. तेव्हापासून ते आतापर्यंत या विषाणूने महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहेत. त्याचे वास्तव्य वाढलेले असून आतापर्यंत १ लाख २० हजार ५०४ जणांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांपैकी ६० हजार ८३८ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात पुणे व मुंबई येथे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या दोन्ही शहरांना मोठा फटका बसला असून अद्याप ही शहरे रेडझोन मध्येच आहेत.गेल्या १०० दिवसांमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्र बेजार झाला असला तरी आता सरासरी रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.

पुणे: पुणे शहर जिल्ह्यातील रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढत असून प्रलंबित अहवालातील काही अहवाल प्राप्त होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. शहर जिल्ह्यात गुरुवारी ५१५ एवढे रुग्ण वाढले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर १९३ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात ४५१ एवढ्या रुग्णांना संसर्ग झाला आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. पुणे ग्रामीण आणि पुणे कँटॉन्मेंट बोर्डासह नगरपालिकांध्ये अनुक्रमे १७ आणि १४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहर जिल्ह्यात एकूण ५१५ रुग्ण नव्याने वाढले आहेत. परिणामी रुग्णांची संख्या १३ हजार ७५० पर्यंत पोहोचली आहे. शहरात गुरुवारी २४६४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे चाचण्यांची संख्यांनी ८० हजारांचा टप्पा ओलांडला असून ८१ हजारह ५११ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. २४५ रुग्ण गंभीर असून त्यापैकी ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच १९३ रुग्ण डिस्चार्ज करण्यात आले असून आतापर्यंत ६९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून ३७२२ रुग्ण सद्या उपचाराखाली आहेत.

जागतिक पातळीवर थैमान घालत असलेला करोना विषाणू महाराष्ट्रात ९ मार्चला पोहोचला. तेव्हापासून ते आतापर्यंत या विषाणूने महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहेत. त्याचे वास्तव्य वाढलेले असून आतापर्यंत १ लाख २० हजार ५०४ जणांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांपैकी ६० हजार ८३८ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात पुणे व मुंबई येथे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या दोन्ही शहरांना मोठा फटका बसला असून अद्याप ही शहरे रेडझोन मध्येच आहेत.गेल्या १०० दिवसांमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्र बेजार झाला असला तरी आता सरासरी रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. मार्च महिन्यात १२ टक्क्यांवरून रुग्णवाढीचा दर हा ४ टक्क्यांवर आला तर रुग्ण दुपटीचा कालावाधी साडेतीन दिवसांवरून २५.९ दिवसांवर पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एप्रिलमध्ये संसर्ग वाढीचा दर हा १२ वरून ७ टक्क्यांवर आला. पाच टक्क्यांनी हे प्रमाण घटल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ ३१ मे पर्यंत हाच दर पुन्हा खाली घसरला असून तो ४ टक्क्यांवर आला आहे. त्याचवेळी मार्चमध्ये साडेतीन दिवसांवर असलेला रुग्णदुपटीचा कालावधी हा २०.१ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. १६ जूनपर्यंत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ३ टक्क्यांपर्यंत आला आहे. म्हणजेच गेल्या १०० दिवसातं ९ टक्क्यांनी हे सरासरी प्रमाण घटले आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी देखील २५.९ दिवसांपर्यंत वाढल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात ९ मार्चपासून करोना संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून ते ३१ मार्चपर्यंत ससंर्गाचा रुग्णवाढीचा दर हा १२ टक्क्यांवर होता. त्यावेळी साडेतीन दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह आरोग्य विभाग आणि राज्य सरकारला घाम फुटला होता. परंतु, विविध ठिकाणी, विविध भागातील कंटेनमेंट झोन मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने संसर्गाचा प्रसार रोखण्यात काही अंशी यश येऊ लागले. त्याशिवाय सर्वच रुग्णांच्या चाचणी की लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या, उपचाराचे प्रोटोकॉल यात सातत्याने केले जाणारे बदल यामुळे रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी वाढत गेला. त्याशिवाय संसर्गाचे वेगही कमी होत गेल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीतून तसेच आकडेवारीतून दिसून आले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live