गूगल करेल पैशाची बचत : गूगल मॅपचे नवे फीचर 

साम टीव्ही ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

गूगल नकाशामध्ये Google Map असे फीचर येणार आहे, जे वाहनांना इंधनवरील खर्च कमी करण्यास मदत करेल. गूगलचे Google नवीन फीचर फक्त चांगले रस्तेच Roads दाखवणार नाही तर उत्तम नेव्हीगेशन रूट Navigation route देखिल दाखवेल.

नवी दिल्ली - गूगलने Google  अलीकडेच परिषद आयोजित केली होती. यामध्ये गूगलने Google  म्हंटले आहे की, गूगल नकाशा Google Map लवकरच अपडेट होणार आहे. गूगलने केलेल्या नव्या अपडेटमध्ये Updates गूगलने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करणार आहे असे सांगितले आहे. म्हणजेच गूगल नकाशामध्ये Google Map असे फीचर येणार आहे, जे वाहनांना इंधनवरील खर्च कमी करण्यास मदत करेल. गूगलचे Google नवीन फीचर फक्त चांगले रस्तेच Roads दाखवणार नाही तर उत्तम नेव्हीगेशन रूट Navigation route देखिल दाखवेल. येत्या काही महिन्यामध्ये नवे फीचर प्रसिद्ध केले जाणार आहे.   Google will save money: New features of Google Maps

हे देखिल पहा - 

गूगलनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करत असल्याचे सांगितले आहे. म्हणून नव्या फीचरनुसार गूगल नकाशे आता रट्याने कमी गर्दी असलेला मार्ग दाखवणार आहे आणि वाहन चालकाला कमी वेळात नॉन-स्टॉप जाता येणार आहे. याचा फायदा असा असेल की, प्रवास आणखी सुलभ होणार आणि इंधनाची बचत देखिल होणार आहे. यासाठी गूगल मशीन शिक्षण तंत्रज्ञनाची मदत घेणार आहे. या वार्षिक परिषदेमध्ये अल्फबेट  कंपनीने गूगल मॅपचा नाव लेआउट देखिल सादर केला आहे. 

या फीचर्च उपयोग दिव्याग लोकांना देखिल होणार आहे. कारण मॅपमध्ये असे रास्ते देखिल दाखवले जाणार आहे की त्यामुळे लोकांना चालणे सहज शक्य होणार आहे. रस्त्यावर  गूगल  आता रस्त्याची रुंदी दाखवणार आहे. तसेच मॅपवरील थेट दृश्य दिसणार आहे तसेच काही इमारतींच्या घरातील नेव्हीगेशन दर्शवनार आहे. 

शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण

गूगलने अलीकडेच ' डिजिटल कार की' चा खुलासा केला आहे. ही अँड्रॉइड स्मार्टफोन बेस्ड टेक्नॉलॉजी  आहे. यातमध्ये नवीन अँड्रॉइड 12 ओएस देण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्ते स्मार्टफोनमधून कार लॉक, अनलॉक, तसेच कार देखिल सुरू करू शकणार आहे. गुगल फील्ड कम्युनिकेशन (NFC) आणि अल्ट्रा वाईड बँड रेडिओ तंत्रज्ञानाजवळ  'डिजिटल कार की' चा वापर केला जाणार आहे. जर तुम्ही कार अनलॉक करण्याचा आदेश दिल्यास ती स्वयंचलितपणे अनलॉक होईल. तसेच ही "रिमोट की " तुम्ही मित्रासोबत देखिल शेअर करू शकता. त्यामुळे ते तुमची कार वापरू शकतात. 

 

Edited By - Puja Bonkile 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live