बारामतीमधील बाळा दराडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात 

साम ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या बाळा दराडेला बारामती पोलिसांनी अटक केली आहे.  गेल्या दोन वर्षापासून बारामती पोलिसांना दराडे हुलकावणी देत होता

बारामती : अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या बाळा दराडेला बारामती पोलिसांनी (Baramati)  अटक केली आहे.  गेल्या दोन वर्षापासून बारामती पोलिसांना दराडे हुलकावणी देत होता. अखेर बाळा दराडे सह त्याच्या साथीदाराला काल पहाटे नाशिकमधल्या (Nashik) पंचवटीमधून  अटक करण्यात आली आहे. Goon Bala Darade in Baramati finally caught by the police

त्यायच्यावर खुनाचा प्रयत्न करणे,पोलिसांवर पिस्तूल रोखणे, दरोडा ,घरफोडी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.राजस्थान, गुजरात ,मध्यप्रदेश (Rajasthan, Gujarat, Madhya Pradesh) मध्ये गेल्या काही वर्षांपासून तो लपून बसला होता.

त्याच्या विरोधात बारामती, भिगवण, वालचंद नगर, सातारा, फलटण आणि कराड पोलीस (Police0 ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल  झाले आहेत. त्याच्यावर मोका देखील लावण्यात आला होता.  तरीही बाळा दराडे गेल्या काही दिवसापासून पोलिसांच्या रडारवर होता. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. Goon Bala Darade in Baramati finally caught by the police

औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत माजवणे तसेच शस्त्रास्त्र बाळगून दहशत माजवणे.अशा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होते, त्याने युवकांच्या टोळ्या बनवल्या होत्या. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते.  या वरती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील चिंता व्यक्त केली होती.अखेर बारामती पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात आहेत. 

Editing By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live