मागासर्गीय पदोन्नती आरक्षणावरून सावळा गोंधळ ; पडळकरांची टीका ( पहा व्हिडिओ )

भारत नागणे
शुक्रवार, 21 मे 2021

राज्यातील मागासर्गीय यांच्या पदोन्नती मधील आरक्षणावरून जो सावळा गोंधळ सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी  आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

पंढरपूर - राज्यातील मागासर्गीय यांच्या पदोन्नती Promotion मधील आरक्षणावरून जो सावळा गोंधळ सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी CM भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी केली आहे. gopichand padalkar on ajit pawar

महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले यावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत Nitin Raut आणि उप समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील विसंवाद समोर आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे की नक्की काय झाले हे स्पष्ट  सांगावे.  

तसेच ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी  २००६ मध्ये मंत्री मंडळ उप समिती गठित झाली होती. त्यांनी ओबीसीला १९ % पदोन्नती मध्ये आरक्षण  देण्याची शिफारस केली होती. पण अद्याप सरकारने अमलात आणले नाही. gopichand padalkar on ajit pawar

International Tea Day 2021: एक कप चहा आजून होऊन जाऊद्या.. 

अजित पवार ajit pawar यांना मागासर्गीय  नोकरी Job पदोन्नती आरक्षण मंत्री मंडळ उप समितीचे प्रमुख करने म्हणजे मेंढरांनी लांडग्या कडून संरक्षणाची अपेक्षा करावी अशा पद्धतीचे होईल असा टोला गोपीचंद पडळकरांनी अजित पवार यांना लगावला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live